4 वर्ष प्रलंबित असलेली शिष्यवृत्ती मिळण्यासाठी अभाविपच्यावतीने आक्रोश मोर्चा

Updated On:

महाराष्ट्र शासनाकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दरवर्षी देण्यात येणारी शिष्यवृत्ती गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित आहे. राज्य शासनाकडून एस सी. , एस बी सी ,ओबीसी, एनटी. इ. बी. सी. , व्ही. जेएनटी, आशा अनेक प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवर्गानुसार शैक्षणिक शुल्कात अनुदान म्हणून शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात कपात झाल्यामुळे त्यांना अल्पदरात शिक्षण घेता येते. ही शिष्यवृत्ती राज्य शासनाकडून गेली चार वर्षे विद्यार्थ्यांना दिली गेलेली नाही. यामुळे सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेता आला नाही.

महाराष्ट्र राज्यातील एकूण ५ लाख ५० हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित आहे. या सर्व शिष्यवृत्तीचे एकूण ६ हजार कोटी रुपये राज्य शासनाने विद्यार्थ्यांना लवकरात लवकर द्यावेत. यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुणे महानगराकडून विद्यार्थी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते.या मोर्चाला पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरुवात करण्यात आली.

आणखी संबंधित बातम्या

Vitthal Langhe : नेवाशाच्या विकासासाठी आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील आक्रमक; एकाच दिवशी पाच मंत्र्यांशी थेट चर्चा!

2026-10-06 21:59:12

Vitthal Langhe : नेवाशाच्या विकासासाठी आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील आक्रमक; एकाच दिवशी पाच मंत्र्यांशी थेट चर्चा!

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांनी शब्द पाळला ! 'या' अधिकाऱ्याची केली बदली

2026-10-02 16:31:28

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांनी शब्द पाळला ! 'या' अधिकाऱ्याची केली बदली

Administrative Division : मोठी बातमी! 'या' चार जिल्ह्यांचे प्रशासकीय विभाजन होणार; बावनकुळे यांची घोषणा

2026-09-23 21:22:14

Administrative Division : मोठी बातमी! 'या' चार जिल्ह्यांचे प्रशासकीय विभाजन होणार; बावनकुळे यांची घोषणा

MPSC Paper Leak : "एमपीएससी पेपर फोडणाऱ्यांना ठोकून काढू"; 'या' नेत्याने दिला इशारा

2026-09-12 15:39:32

MPSC Paper Leak : "एमपीएससी पेपर फोडणाऱ्यांना ठोकून काढू"; 'या' नेत्याने दिला इशारा

Devendra Fadnavis : मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय; तुकाराम मुंढेंच्या सुट्या तेलाच्या निर्णयाला स्थगिती

2026-09-01 18:15:55

Devendra Fadnavis : मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय; तुकाराम मुंढेंच्या सुट्या तेलाच्या निर्णयाला स्थगिती