Akola News : पोलीस भरतीचं स्वप्न राहिलं अधुरं; 18 वर्षाच्या रोहितसोबत नेमकं काय घडलं?

अकोला : महाराष्ट्रात सध्या प्रचंड ऊन पडले आहे. राज्याचे तापमान ४० च्या वर गेले आहे. राज्यात सर्वाधिक तापमान हे विदर्भात असून वाढत्या गरमीपासून दिलासा मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात कुलरचा वापर केला जात आहे. मात्र याच कुलरने एका 18 वर्षाच्या तरुणाचा जीव घेतला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
रोहित विठ्ठल बावस्कर (18 वर्षे) असे मृत तरूणाचे नाव आहे. रोहित हा पोलीस भरतीसाठी रोज सकाळी सराव करत असे. रविवारी देखील नेहमीप्रमाणे पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी झोपेतून उठला. सर्व तयारी केली त्यानंतर बाहेर सरावासाठी जाण्यासाठी तो पायात बूट घालत असताना त्याला कुलरचा शॉक बसला, हा शॉक इतका जबर होता की रोहितचा जागीच मृत्यू झाला. अकोल्यातील सरप येथे ही घटना घडली आहे.
रात्री गरम होत असल्याने कुलर लावला होता. दरम्यान या कुलरमध्ये विद्युत प्रवाह उतरलेला असताना बूट घालत असताना रोहितचा या स्पर्श झाला आणि त्याला जोरात शॉक बसला. हा शॉक एवढा जबर होता कि रोहितचा जागीच मृत्यू झाला. रोहितला पोलीस अधिकारी व्हायचं होतं मात्र त्याचे हे स्वप्न अधुरं राहिलं. आपल्या तरुण मुलाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.





