अकोला – फिरायला गेलेल्या तरूणाचा फोटो काढतेवेळी पाय घसरून नदीत पडल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना अकोल्यातील वारी हनुमान परिसरात घडली. अनिल रामकृष्ण सरोकार (वय24, रा. खांडवी, बुलडाणा) याचा मृत्यू झाला आहे.
अनिल वारी हनुमान येथे फिरण्यासाठी आला होता. नदीपात्रात फोटो काढत असताना त्याचा पाय घसरला. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो वाहून गेला. सकाळी त्याचा मृतदेह सापडला. अनिल होमगार्ड पदावर कार्यरत होता. घरातील एकटा कमावता होता. त्याच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
अनेकजण फिरायला गेल्यावर उत्साहात असतात. अतिउत्साहामुळे धोक्याच्या ठिकाणी फोटो काढतात. धोक्याच्या ठिकाणी फोटो काढणे, सेल्फी घेणे जीवघेणे ठरू शकते. त्यामुळे फिरायला गेल्यावर फोटो काढतेवेळी धोक्याची ठिकाणे टाळली पाहिजे.