“विष मिसळून दिल तर…” अखिलेश यादव यांचा पोलीस मुख्यालयात चहा पिण्यास नकार

नवी दिल्ली – लखनौ पोलिसांनी शनिवारी समाजवादी पक्षाचा कार्यकर्ता आणि ट्विटर ऍडमिनिस्ट्रेटरला अटक केली. याचा निषेध करत सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पोलिस मुख्यालय गाठले. त्यांनी अटकेला विरोध करत सरकारची हुकूमशाही चालणार नाही, असे सांगितले.यावेळी त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते देखील होते.यावेळी कार्यकर्त्यांनी योगी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.
यावेळी पोलीस मुख्यालयातील अधिकाऱ्यांनी अखिलेश यादव यांना चहा घेण्याची विनंती केली. मात्र याला अखिलेश यादव यांनी चहा घेण्यास नकार दिला. ते म्हणाले,”आम्ही आमचा चहा घेऊन येतो.. तुम्ही तुमचा घ्या आपण सोबत चहा पिऊ.आमचा तुमच्यावर विश्वास नाही,तुम्ही विष मिसळून दिल तर ? त्यापेक्षा आम्ही आमचा चहा घेऊन येतो,हवं तर कप तुमचे घेतो.” असं अखिलेश यादव यावेळी म्हणाले.
#WATCH समाजवादी पार्टी प्रमुख अखिलेश यादव ने पुलिस मुख्यालय में चाय पीने से इंकार किया।
उन्होंने कहा,”हम यहां की चाय नहीं पियेंगे। हम अपनी (चाय) लाएंगे, कप आपका ले लेंगे। हम नहीं पी सकते, ज़हर दे दोगे तो? हमें भरोसा नहीं। हम बाहर से मंगा लेंगे।”
(वीडियो सोर्स: समाजवादी पार्टी) pic.twitter.com/zwlyMp8Q82
— ANI_HindiNews (@AHindinews) January 8, 2023
समाजवादी पार्टीचे ट्विटर ऍडमिन मनीष जगन अग्रवाल यांना शनिवारी सकाळी लखनऊ पोलिसांनी अश्लील टिप्पणी केल्याप्रकरणी अटक केली. त्याच्यावर लखनौच्या हजरतगंज पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत.या प्रकरणाच्या माहितीवरून अटकेच्या निषेधार्थ सपाचे कार्यकर्ते पोलिस मुख्यालयात पोहोचले आणि तिथेच बसले. त्यांनी कार्यकर्त्याच्या सुटकेची यावेळी जोरदार मागणी केली.





