Akalkot News : खेडगी शिक्षण संस्थेचा सांस्कृतिक उपक्रम शहरात गरबा कार्यशाळा व दांडिया स्पर्धेचे आयोजन
विद्यार्थिनी, महिला आणि नृत्यप्रेमींना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ (Akalkot News) उपलब्ध करून देण्याबरोबरच नवरात्रोत्सवाच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन व संवर्धन करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

Akalkot News : नवरात्रोत्सवाच्या उत्साहाला सांस्कृतिक आणि कलात्मकतेची जोड देण्यासाठी अक्कलकोट (Akalkot News) एज्युकेशन सोसायटी संचलित सी. बी. खेडगीज महाविद्यालय, मातोश्री नीलव्वाबाई खेडगी प्रशाला आणि सी. बी. खेडगी इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात प्रथमच गरबा कार्यशाळा व दांडिया स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात आली आहे.
विद्यार्थिनी, महिला आणि नृत्यप्रेमींना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ (Akalkot News) उपलब्ध करून देण्याबरोबरच नवरात्रोत्सवाच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन व संवर्धन करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या उपक्रमांतर्गत १२, १३ व १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत गरबा कार्यशाळा आयोजित करण्यात आली. सोलापूर येथील गरबा प्रशिक्षक राकेश सोनी यांनी सहभागी विद्यार्थिनी व महिलांना गरबा आणि दांडिया नृत्याचे विशेष प्रशिक्षण दिले. या कार्यशाळेतून सहभागी महिलांना नृत्यातील विविध शैली, तालबद्ध हालचाली आणि प्रभावी सादरीकरणाचे तंत्र शिकण्याची संधी मिळाली.
या उपक्रमाचा मुख्य आकर्षण असलेली गरबा-दांडिया स्पर्धा शुक्रवारी (दि. १६) सायंकाळी ४ ते ७ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत ‘बेस्ट गरबा’, ‘बेस्ट दांडिया’, ‘बेस्ट मेकअप’, ‘बेस्ट कॉस्च्युम’ आणि ‘बेस्ट मदर अँड डॉटर दांडिया’ अशा विविध गटांत सहभागी स्पर्धकांना आपले कौशल्य सादर करता येणार आहे. विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली असून, विशेष लकी ड्रॉद्वारे रोख पारितोषिक जिंकण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येकी ५० रुपये प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले आहे. इच्छुक स्पर्धकांसाठी स्पॉट रजिस्ट्रेशनची सुविधा शुक्रवारी (दि. १६) सायंकाळी ४ ते ५ या वेळेत उपलब्ध असेल.
नृत्य ही केवळ मनोरंजनाची कला नसून आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम आहे. अक्कलकोटमधील विद्यार्थिनी व महिलांना आपली कला सादर करण्याची संधी मिळावी आणि नवरात्रोत्सवाचा आनंद एकत्रितपणे अनुभवता यावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरातील महिलांनी आणि नृत्यप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या सांस्कृतिक (Akalkot News) सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी, संचालिका पवित्रा खेडगी आणि प्राचार्य डॉ. जी. एस. धबाले यांनी केले आहे.
अक्कलकोटच्या सांस्कृतिक जीवनात नवा रंग भरणारा हा उपक्रम नवरात्रोत्सवातील उत्साह, पारंपरिक नृत्यकला आणि महिला सक्षमीकरण यांचा सुंदर संगम ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
पवित्रा खेडगी (संचालिका)






