Rohit Pawar : रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांचा अपघात?; भाजप नेत्याचा दावा
Rohit Pawar

Rohit Pawar : अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी आमदार रोहित पवार यांच्याकडून अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत. हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत ते पत्रकार परिषदेद्वारे अनेक सवाल उपस्थित करत आहेत. याचदरम्यान आता पुणे भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष वैभव सोलनकर यांनी रोहित पवार यांच्याशी संबंधित साखर कारखान्याचा उल्लेख करत मोठा दावा केला आहे.
रोहित पवारांच्या शेटफळगडे येथील साखर कारखान्यातून निघणाऱ्या प्रदूषणामुळे धुकं निर्माण झालं आणि याच धुक्यामुळे विमानाचा अपघात झाला. या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी राज्यपाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली असल्याचे भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी म्हंटले आहे.
पत्रात त्यांनी शेठफळ गडे येथील साखर कारखान्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचा आरोप केला आहे. या कारखान्याच्या धुरामुळे स्थानिक नागरिकांना श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ तसेच त्वचेच्या तक्रारी भेडसावत असल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय या प्रदूषणाचा परिणाम शेतीवरही होत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
सोलनकरांचे रोहित पवारांना आव्हान
अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला त्या दिवशी बारामती परिसरात धुरामुळे दृश्यमानता कमी झाली होती का, औद्योगिक उत्सर्जनामुळे कृत्रिम धुके निर्माण झाले होते का, याची वैज्ञानिक पद्धतीने तपासणी करण्याची मागणीही सोलनकर यांनी केली आहे.
तसेच साखर कारखान्यातून निघणारा धूर विमानतळासाठी अडथळा ठरतो का, याबाबत रोहित पवार यांनी स्वतः सादरीकरण करून भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हानही त्यांनी दिले आहे. Rohit Pawar
रोहित पवारांचे प्रत्युत्तर
मात्र या सर्व आरोपांना रोहित पवार यांनी फेटाळले आहे. हे आरोप पूर्णपणे राजकीय द्वेषातून केले जात असून त्यामागे कोणतेही तथ्य नाही. भाजपचे मोठे नेते स्वतः बोलू शकत नसल्याने चिरकूट लोकांकडून वक्तव्ये करवून घेत असल्याचा पलटवारही रोहित पवारांनी केला. Rohit Pawar
हेही वाचा:
Badshah Song Controversy: बादशाहच्या गाण्यावरून वाद; FIR दाखल होताच मागितली माफी






