Ajit Rajgond : वाघांची शिकार प्रकरणी बहेलिया टोळतील अजित राजगोंडला अटक; सहा दिवसांची वन कोठडी

पुणेः वन्य पशू पक्षी जिवंत किंवा मृत पकडून त्यांचा व्यापर करणाऱ्या बहेलिया शिकारी टोळेतील सुत्रधारांपैकी एक असलेला अजित राजगोंडला अटक करण्यात वन विभागाला यश आले आहे. दहा वर्षांपूर्वी वीस वाघांच्या शिकारी प्रकरणी अजित राजगोंड अटकेत होता. तुरुंगातून सुटून आल्यानंतर तो पुन्हा सक्रिय झाला होता. राजगोंड याच्या विरोधात मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात अनेक गुन्हे दाखल आहेत.
अजित राजगोंडला वाघांची शिकार केल्याप्रकरणी त्याला सहा दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली आहे. गेल्या एक-दोन वर्षातील वास्तवादरम्यान मध्यप्रदेशातून त्याने किमान दहा वाघांची शिकार केली असावी असा अंदाज वनविभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
७० लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचा संशय
मिळालेल्या माहितीनुसार, राजुरा तालुक्यातील बामणवाडा येथील वस्तीलगतच डेरा टाकून अजित आणि त्याचे कुटुंबयीय राहत होते. स्थानिक वन विभागाचे कर्मचारी, पोलीस पोलीस पाटील किंवा अन्य कुणालाही थांगपत्ता लागू न देता अजित बऱ्याच काळापासून त्याच ठिकाणी भारतातील शिकारीची सूत्रे हलवत असल्याची धक्कादायक माहिती वन विभागाला चौकशी मिळाली आहे. तसेच त्याच्या फोनद्वारे किमान ७० लाख रुपयांचे व्यवहास झाल्याचे देखील समोर आले आहे. वन विभागाने केलेल्या कारवाईत त्याची कुटुंबीयांना आधी सोडण्यात आले होते, मात्र, चौकशी करिता पुन्हा त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामुळे वन विभागाच्या मते ही चौकशी महत्वाची ठऱणार असून त्यातून कितीतरी बेपत्ता वाघांच्या हत्येचा सुगावा लागू शकतो. असे सांगितले जात आहे.





