Anjana Krishna : अजित पवारांचा फोन कॅाल पण…; पोलिस उपअधिक्षकांनी ओळखलचं नाही; नंतर व्हिडीओ कॅाल आला अन्… नेमकं काय घडलं? व्हिडीओ पाहा..

Anjana Krishna : सोशल मीडियावर करमाळ्याच्या पोलीस उपअधिक्षक अंजना कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून संवाद साधला. मात्र, अंजना कृष्णा यांनी अजित पवारांचा आवाज ओळखलाच नाही. यानंतर अजित पवारांनी थेट व्हिडीओ कॅालवरून त्यांच्याशी संवाद साधला. या व्हिडीओ आणि अॅाडिओ कॅाल संबंधिचा दोन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
माढ्याच्या कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार करमाळाच्या पोलिस उपअधिक्षक अंजना कृष्णा यांना प्राप्त झाली. या तक्रारीवरून त्यांनी संबंधित गावात जात पाहणी केली असता मुरुम उचलण्याच्या मुद्यावरुन कुर्डू गावातील नागरिक आणि त्यांच्यामध्ये शाब्दिक जुगलबंदी झाली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावून अंजली कृष्णा यांच्याकडे दिला.
अजित पवार चांगलेच संतापले अन्…
मात्र, अजित पवार यांचा आवाज अंजली कृष्णा यांना ओळखता आला नाही. अॅाडिओ कॅालवरून अजित पवार दोन वेळा डीसीएम अजित पवार बोल रहा हूं. असं म्हणत ये कार्यवाही बंद करो…मेरा आदेश हैं. त्यावर थेट पोलिस अधिक्षक अंजना कृष्णा यांनी मेरे फौन पर काॅल करें.. असं अजित पवार यांना सांगितलं. या विधानामुळे अजित पवार चांगलेच संतापले आणि त्यांनी तुम पे अॅक्शन लूंगा.. इतनी डेरिंग है तुम्हारी..मेरा चेहरा तो पेहचानोगा ना.. असं रागावून म्हटले, असं या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून दिसत आहे.
करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजली कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोनवरुन ओळखता आले नाही.
त्यानंतर रागावलेल्या अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना खडेबोल सुनावत थेट व्हिडीओ काॅलच केला.#ajitpawar #AnjaliKrishna pic.twitter.com/ag2DNuf3do— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) September 2, 2025
दोन्ही व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल
सोशल मीडियावर दोन व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहे. यापैकी एका व्हिडीओत कृष्णा या अजित पवारांसोबत अॅडिओ कॅालवर बोलताना दिसत आहेत. तर दुसऱ्या व्हिडीओत कृष्णा या बांधावरच जाऊन बसून अजित पवारांसोबत बोलताना दिसत आहेत. हा संपूर्ण प्रकार तब्बल ३ तास घटनास्थळी सुरू होता. मात्र, या प्रकरणी पोलिसांकडे कसलीही तक्रार अथवा गुन्हांची नोंद झालेली नाही. हा प्रकार काल १ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी घडल्याची माहिती आहे.
हेही वाचा : अलिशान फ्लॅटच्या विक्रीनंतर हेमा मालिनींची नवी खरेदी; शेअर केला व्हिडिओ





