सातारा – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. करोनाच्या संकटामुळे कोणताही मोठा कार्यक्रम न घेता विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. जिल्ह्यातील विविध प्रश्न मार्गी लावणाऱ्या आपल्या नेत्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा मानस राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मात्र, करोनाचे संकट असल्याने वाढदिवस साजरा करु नका, असे आवाहन अजित पवार यांनी केले होते. त्यामुळे कुठलाही मोठा कार्यक्रम न करता सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. पक्षाच्यावतीने येथील राष्ट्रवादी भवनात जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, दीपक पवार, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष समिंद्रा जाधव, कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन भागवत घाडगे, सचिव राजेंद्र येवले, विद्यार्थी अध्यक्ष अतुल शिंदे, अल्पसंख्याक अध्यक्ष शफिक शेख, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. प्रसन्न बाबर, सचिन बेलागडे,निवास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रवादी सेवादलातर्फे कार्यालय परिसरात कृषी सभापती मंगेश धुमाळ व जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. नागठाणे येथे अल्पसंख्याक सेलच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अशोकराव जाधव, स्मिता देशमुख, नाना इंदलकर, दीपिका घाडगे, बाबा सय्यद, हनुमंत जाधव, बाळासाहेब शिंदे, मारुती इधाटे, पूजा काळे, गोरख कदम, अक्षय शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.