Rohit Pawar : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात आणि त्यावरुन निर्माण झालेले संशयाचे झाळे आता अधिकच घट्ट होताना दिसत आहे.विमान अपघाताची दुर्देवी घटना घडून आता १ महिन्याहून आणि काही दिवस पूर्ण झाले आहेत. रोहित पवार सातत्याने अपघातावर संशय व्यक्त करत आहेत. ट्वीटच्या माध्यमातूनही अपघाताबाबत गंभीर आरोप करत दावे करत आहेत. आता त्यांनी आणखी एक ट्वीट करत व्हीएसआर कंपनीच्या मालकावर खळबळजनक आरोप केला आहे. व्हीसीआर कंपनीचा मालक व्ही. के. सिंग सद्यस्थितीला आपल्या मर्जीतील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून FDR (balckbox चा एक भाग ज्यामध्ये विमानांची सर्व तांत्रिक माहिती रेकॉर्ड झालेली असते) मधील एडिट करत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. यामुळे या प्रकरणात पुन्हा एकदा बॅल्क बॅासचा विषय चर्चेत आला आहे. तसेच रोहित पवारांनी ट्वीटमध्ये DGCA किंवा AAIB मधील जे कुणी याकामी मदत करत असतील किंवा करणार असतील त्यांनी forensic audit मध्ये हा फेरफार पकडला जाईल, याची नोंद असू द्यावी. असेही म्हटले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी एक फोटोही शेअर केला आहे. हा फोटो बॅल्क बॅासचा असण्याची शक्यता आहे. Rohit Pawar , Rahul Gandhi, हेही वाचा : John Bolton on Trump: “ट्रम्प यांनी परिस्थितीचा चुकीचा…” ; इराण युद्धावरून अमेरिकेच्या माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराने ट्रम्प यांना फटकारले रोहित पवार नेमकं काय म्हणाले? Rohit Pawar फेरफार करण्यात अत्यंत सराईत असलेला VSR कंपनीचा मालक व्ही. के. सिंग सद्यस्थितीला आपल्या मर्जीतील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून FDR (balckbox चा एक भाग ज्यामध्ये विमानांची सर्व तांत्रिक माहिती रेकॉर्ड झालेली असते) मधील एडिट करत असल्याची माहिती मिळाली आहे. DGCA किंवा AAIB मधील जे कुणी याकामी मदत करत असतील किंवा करणार असतील त्यांनी forensic audit मध्ये हा फेरफार पकडला जाईल, याची नोंद असू द्यावी. उद्या आम्ही संसदेच्या माध्यमातून समिती स्थापन केल्यानंतर (जी होणारच आहे) आणि त्यात forensic audit झाले जे होणारच आहे तेंव्हा VSR कंपनीला वाचवायला कुणीही येणार नाही. तसंच DGCA मध्ये अनेक अधिकारी प्रामाणिक देखील आहेत हेही लक्षात असू द्यावं.. फेरफार करण्यात अत्यंत सराईत असलेला VSR कंपनीचा मालक व्ही. के. सिंग सद्यस्थितीला आपल्या मर्जीतील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून FDR (balckbox चा एक भाग ज्यामध्ये विमानांची सर्व तांत्रिक माहिती रेकॉर्ड झालेली असते) मधील एडिट करत असल्याची माहिती मिळाली आहे. DGCA किंवा AAIB मधील जे… pic.twitter.com/AvqNnNgLZi — Rohit Pawar (@RRPSpeaks) March 13, 2026 रोहित पवारांनी घेतली राहुल गांधीची भेट Rohit Pawar अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी व्ही. के सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी रोहित पवारांनी लावून धरली आहे. या दरम्यान ते अनेक नेत्यांची भेट घेत आहेत. काल १२ मार्च त्यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेत अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी चर्चा केली. या अपघाताबाबत वेगवेगळ्या स्त्रोतांकडून आम्ही अत्यंत मेहनतीने जमा केलेली संपूर्ण माहिती त्यांना दिली आणि जनहिताचे इतर विषय ज्याप्रमाणे लोकसभेत लावून धरतात त्याप्रमाणे अजितदादांच्या अपघाताच्या विषयावरही लोकसभेत आवाज उठवून याबाबत निष्पक्ष चौकशी करण्यास सरकारला भाग पाडा, अशी विनंती केली रोहित पवारांनी राहुल गांधीकडे केली आहे. हेही वाचा : Maharashtra Goverment : गॅस सिलेंडरच्या सुरळीत पुरवठ्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय! जिल्हाधिकाऱ्यांना सूचना जारी