Ajit Pawar : अजित पवार यांनी देहू येथे घेतले संत तुकाराम महाराज मंदिरांचे दर्शन

देहूगाव : राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बुधवारी देहू येथील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानातील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर, श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि श्रीराम मंदिरात दर्शन घेतले.
यावेळी आमदार सुनील शेळके, संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. गणेश महाराज मोरे, ह.भ.प. वैभव महाराज मोरे, ह.भ.प. दिलीप महाराज मोरे, विश्वस्त ह.भ.प. विक्रमसिंह मोरे, ह.भ.प. उमेश महाराज मोरे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मोरे आदी उपस्थित होते.
दर्शनानंतर संस्थानच्यावतीने अजित पवार यांचा सत्कार करण्यात आला. टाळ-मृदुंगाच्या गजरात, ‘ज्ञानोबा माऊली’, ‘माऊली, माऊली’ च्या जयघोषात, तुळशी वृंदावन आणि दिंड्या-पताका हाती घेतलेल्या वारकऱ्यांच्या भक्तिमय वातावरणात संत तुकाराम महाराज यांच्या आषाढीवारी पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले.





