अंमली पदार्थ विकणाऱ्यांना फाशीची शिक्षाच दिली पाहिजे – अजित पवार

मुंबई – मुंबई, ठाण्यासारख्या शहरांप्रमाणेच महाराष्ट्रातील इतर शहरात देखील अंमली पदार्थ घेण्याचे प्रकार वाढले आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी अमंली पदार्थ विकणाऱ्यांना थेट फाशी देण्याचा कायदा करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सभागृहात केली आहे.

आज विधानसभेत विधीमंडल पक्षनेते अजित पवार यांनी यासंदर्भातील विषयाकडे लक्ष वेधले. अजित पवार म्हणाले की, ‘अंमली पदार्थांच्या आहारी जाऊन तरुणपिढी बरबाद होतेय. कामात व्यस्त आई-वडिलांना ११-१२ वी मधली मुलं काय करतात, याची कल्पना नसते. मुंबई, ठाण्यासारख्या शहरांप्रमाणेच इतर शहरांतही प्रकार वाढलेत. याला आळा घालण्यासाठी अंमली पदार्थ विकणाऱ्यांना फाशीची शिक्षाच दिली पाहिजे!

दरम्यान, अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांना उत्तर देताना गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी अंमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी कायद्यात सुधारणा करू तसेच मुंबई शहरात स्थापन केलेला स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी कक्ष प्रत्येक जिल्ह्यात स्थापन करण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.