Anjali Damania Vs Ajit Pawar | पार्थ पवार यांच्या पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी “उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही वाचवू शकणार नाहीत. अजित पवारांच्या आजवरच्या घोटाळ्यांविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहे”, असा थेट इशारा दिला होता. याशिवाय अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी देखील दमानियांनी केली. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून मला योग्य वाटेल ते मी करेन” असे अजित पवार यांनी म्हंटले आहे. पुण्यात एका कार्यक्रमात उपस्थित राहिले असतं पुण्यातील चिंतामणी ज्ञानपीठ आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने चिंतामणी चौक ते निलगिरी चौक हा रस्ता दत्तक घेण्याच्या योजनेचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते झाला. त्यानंतर प्रसारमाध्यमांसोबत ते बोलत होते. .. तोपर्यंत मी कोणतेही भाष्य करणार नाही तसेच पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने घेतलेल्या जमिनीच्या व्यवहाराबाबत चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. समितीला याचा अभ्यास करू द्या, काय अहवाल येतो त्याबद्दल निर्णय वरिष्ठ घेतील, तोपर्यंत मी कोणतेही भाष्य करणार नसल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. Anjali Damania Vs Ajit Pawar | दरम्यान, सरकारी जमीन हडपल्याच्या आरोपावरून शीतल तेजवानी, पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील आणि इतर संबंधितांविरोधात खडकी आणि बावधन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. Anjali Damania Vs Ajit Pawar | हेही वाचा: मनसेच्या बड्या नेत्याच्या भावाची EDकडून चौकशी; निवडणुकीच्या रणधुमाळीत वाढल्या अडचणी?