उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते सपत्नीक दगडूशेठ गणपतीची आरती…

Ajit Pawar At Dagdusheth Ganpati | लाडक्या गणरायाची मनोभावे आराधना केल्यानंतर शनिवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्याला निरोप देण्यात येणार आहे. पूजा, आरती आणि ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. दरम्यान, पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा सुरु झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली.
यावेळी त्यांच्यासोबत सुनेत्रा पवारही उपस्थित होत्या. अजित पवारांच्या हस्ते सपत्नीक मुख्य मंदिरात पूजा आणि आरती करण्यात आली. यानंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी देखील संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण,
गणेशोत्सव आणि इलेक्शन यावर भाष्य केले.
दरम्यान, ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’. या गजरात आज राज्यभरातील गणेशभक्त आपल्या लाडल्या गणरायाला निरोप देतील. दहा दिवसांच्या भक्ती, उत्साह आणि आनंदानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. सावर्जनिक मंडळातील गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. तसेच घरगुती गणपतींना देखील आज निरोप दिला जाणार आहे.
हेही वाचा:





