Ajit Pawar passed away : राज्याच्या राजकारणात आमच्या कामाच्या माध्यमातून वेगळा आदर्श निर्माण करणारे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने राज्यासह देशातील राजकीय वर्तुळाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, हे वृत्त समजताच राष्ट्रवादी काँग्रेसपक्षासह अनेक नेते बारामतीकडे रवाना होत आहेत. आज सकाळी बारामती दौऱ्यासाठी निघताना अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. विमान लँडिग होतानाच अपघातग्रस्त झाले. अपघातानंतर विमानाचे अक्षरश: तुकडे झाले होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पॅक्सचे नेते छगन भुजबळ हे अजित पवार यांच्या बारामतीकडे रवाना झाले आहेत. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील हे देखील बारामतीकडे जायला निघाले आहेत. Ajit Pawar passed away : ज्यामध्ये पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. आज अजित पवार यांचा बारामती दौरा होता. या बारामती दौऱ्यासाठी आज सकाळी बारामतीसाठी त्यांनी प्रस्थान केलं होतं. बारामतीमध्ये विमान लाँडिंग होत असतानाच विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विमान अपघातग्रस्त झाले. विमानामध्ये अजित पवार यांच्यासह सहा जण होते आणि या सहा जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. अजित पवार यांच्या अकाली जाण्याने पवार कुटुंबीयांसह अवघ्या राज्याला मुळापासून हादरा बसला आहे. अपघातग्रस्त विमान पाहिल्यानंतर अनेकांना जागेवर अश्रु अनावर झाले. Ajit Pawar passed away :