Ajit Pawar : ‘महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यात आघाडीवर असलेले…’; दादांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींकडून दु:ख व्यक्त

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अजित पवार यांची अपघातात अशी अकाली एक्झिट मनाला चटका लावणारी आहे. नवीन वर्षांच्या सुरुवातीच्या महिन्यातच या दुःखद बातमीने महाराष्ट्र हादरला आहे.
संपूर्ण बारामती सुन्न झाली असून मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली आहे. अनेक राजकीय मंडळींना अश्रु अनावर झाले आहेत. अनेकांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्वीट करत उपमुख्यमंत्री अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Shri Ajit Pawar Ji was a leader of the people, having a strong grassroots level connect. He was widely respected as a hardworking personality at the forefront of serving the people of Maharashtra. His understanding of administrative matters and passion for empowering the poor and… pic.twitter.com/mdgwwGzw4R
— Narendra Modi (@narendramodi) January 28, 2026
पंतप्रधान मोदी यांचे ट्वीट
पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत लिहिले की, “अजित पवार हे जनतेचे नेते होते, त्यांचे तळागाळातील लोकांशी मजबूत संबंध होते. महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यात आघाडीवर असलेले कष्टाळू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा सर्वत्र आदर केला जात असे.
प्रशासकीय बाबींबद्दलची त्यांची समज आणि गरीब आणि दलितांना सक्षम बनवण्याची त्यांची आवड देखील उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन खूप धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती.’
Ajit Pawar : “500 फूटांवरून विमान खाली कोसळलं आणि…”; अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला?





