मुंबई – ताकदीने विधानसभा लढवायची आहे. आपले 54 आमदार आहेत, तेवढ्या जागा तर आपल्याला मिळणारच आहे. त्यापेक्षा काँग्रेसच्या जागा आपल्याला मिळतील. जवळपास 90 जागा आपल्याला लढवायच्या असल्याचे अजित पवारांनी मुंबईतील बैठकीत केले. यावरून अजित पवार यांच्या या विधानामुळे आता शिंदे गटातील आमदारांच्या नाराजीत अजूनच भर पङणार आहे. अशात भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी यावर आता माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे. ‘जागांबद्दल काय बोलण झालं? काय नाही? हे माझ्या अधिकार क्षेत्रात येत नाही. परंतु निवडणूका लागत नाही, तो पर्यंत जागा वाटपाचा निर्णय होत नाही. साधराण युतीमध्ये असं असंत” “आम्ही म्हटलं इतक्या जागा लढू, एकनाथ शिंदे म्हणाले, इतक्या जागांवर लढू पण खरं चित्र हे निवडणुका लागल्यानंतरच स्पष्ट होतं. त्यामुळे राष्ट्रवादी 90 जागा लढवणार हे माझ्या दृष्टीने महत्वाच नाही’ असं म्हणत बावनकुळे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, महिन्यापूर्वींच आगामी विधानसभा निवडणुकीत 240 जागा लढवण्याचा भाजपाचा विचार आहे, त्यामुळे तयारीला लागा, असं आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केलं होतं. मात्र, यानंतर शिवसेना शिंदे गट आक्रमक झाल्याने बावनकुळे यांनी आपल्या विधानावरुन पलटी मारली होती आणि शिवसेना भाजप युती आगामी विधानसभा निवडणुकीत नक्की किती जागा लढवणार याचा फॉर्म्युला अजून ठरलेला नाही, असे स्पष्टीकरणच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले होते.