Ajit Pawar: अजित पवार यांचा जन्मदिवस शासकीय सूचीत समाविष्ट करा
Ajit Pawar:

Ajit Pawar: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जन्मदिवस दि. २२ जुलै हा राज्यातील शासकीय जयंती कार्यक्रमांच्या सूचीमध्ये समाविष्ट करावा, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
अजित पवार यांचे महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि विकासात्मक जडणघडणीत अत्यंत मोलाचे योगदान राहिले आहे. राज्याच्या प्रगतीतील त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका विचारात घेता, सन २०२६ मधील शासकीय जयंती कार्यक्रमांच्या सूचीमध्ये त्यांच्या जयंतीचा (दि.२२ जुलै) नव्याने समावेश करणे उचित ठरेल.
सामान्य प्रशासन विभागामार्फत सन २०२६ या वर्षात मंत्रालय, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, महाविद्यालये आणि शाळांमध्ये साजरी करावयाची राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींची जयंती आणि राष्ट्रीय दिनांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
या यादीमध्ये अजित पवार यांच्या जयंतीचा नव्याने समावेश करावा आणि यासंदर्भातील आवश्यक सुधारित परिपत्रक त्वरित निर्गमित करून राज्यातील सर्व संबंधित विभागांना, शाळांना व महाविद्यालयांना तात्काळ अवगत करावे, अशी विनंती या पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.





