Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती विमानतळाजवळ भीषण अपघातात निधन झाले. आज दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या प्रचंड जनसमुदाय लोटला. अजित पवार यांच्यावर बारामतीतील विद्या प्रतिष्ठान कॉलेजच्या प्रांगणात अंत्यसंस्कार झाले. या अंत्यसंस्कारासाठी देशभरातील नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी जमले आहेत. अत्यंत शोकाकुल वातावरणात अजित पवारांना अखेरचा निरोप दिला जात आहे. संपूर्ण पवार कुटुंबीय भावुक झाले आहे. आज दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या मूळ गावी काटेवाडी येथे नेण्यात आला होता. त्यानंतर आता काही वेळातच अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. त्यापूर्वी काटेवाडीमध्ये देखील लाडक्या दादाला अखेरचा निरोप देण्यासाठी लाडक्या बहिणी आल्या आहेत. सर्वच जण सुन्न यावेळी एक महिला दादांसाठी राखी घेऊन आल्याचे पाहायला मिळाले. या महिलेने राखी आणून दादांना राखी बांधायची इच्छा अपूर्ण राहिल्याचे सांगत टाहो फोडला. त्यांचा आक्रोश पाहून सर्वच जण सुन्न झाले. ‘दादा, राखी बांधता आली नाही’, असे म्हणताच या लाडक्या बहिणीचा हुंदका पाहून सगळेच हतबल झाले. दादांची गुलाबी थीम गाजली दरम्यान, गेल्या वर्षी विधानभा निवडणुकीवेळी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने आणली आणि ही योजना राज्यात लोकप्रिय झाली. अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात दरमहा 1500 रुपयांचा सन्मान निधी आला. महिला आणि बाल कल्याण खाते हे त्यांच्याच पक्षाच्या मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे आहे. या योजनेनंतर अजितदादांच्या प्रचारावेळी लाडकी बहीण योजना आणि गुलाबी थीम खुप गाजली. यानंतर त्यांचा गुलाबी लुक देखील चांगलाच चर्चेत राहिला. हेही वाचा: Ajit Pawar : अत्यंत भावुक क्षण! वहिनींची अवस्था पाहूण नणंद सरसावली; हात धरत सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंनी अंत्यविधीस्थळी आणलं