Ajit Pawar – महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) वतीने बारामती येथे झालेल्या विमान अपघाताची चौकशी सुरु केली आहे. बुधवारी बारामती येथे झालेल्या विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांच्यासह इतर चार जणांचा मुत्यू झाला होता. या अपघातानंतर राज्य शासनाने या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पुणे ग्रामीण पोलीसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ अंतर्गत अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून तो आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. बारामती येथे टेबलटॉप एअरस्ट्रिपच्या काठापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर हा अपघात झाला होता. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या इतरांमध्ये १५,००० तासांचा उड्डाणाचा अनुभव असलेले कॅप्टन सुमित कपूर, १५०० तासांचा उड्डाणाचा अनुभव असलेले सह-वैमानिक कॅप्टन शांभवी पाठक, पवार यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी विदीप जाधव आणि विमान परिचारिका पिंकी माळी यांचा समावेश आहे. सीआयडीच्या पथकाने त्यांचे काम सुरू केले असून पुणे ग्रामीण पोलिसांकडून संबंधित कागदपत्रे गोळा केली जाणार असलयाचे सीआयडीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सीआयडीचे पथक अपघातस्थळाला देखील भेट देणार आहे. मुंबईहून बारामतीला प्रवास सुरू करण्यापूर्वी विमानात कोणत्याही प्रकारची तोडफोड झाली नसल्याची चौकशी सुरू आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) नेही या अपघाताची औपचारिक चौकशी सुरू केली आहे. ही बातमी वाचा…. Virat Kohli Instagram : विराट कोहलीचं इन्स्टाग्राम अकाऊंट अचानक झालं होतं गायब! नेमकं काय होतं कारण? जाणून घ्या