Ajit Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या Learjet 45 विमान अपघाताच्या चौकशीसाठी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्रालयाने (MoCA) तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. ही टीम AAIB ची असून, त्यासोबत DGCA ची आणखी एक तीन सदस्यीय टीमही अपघातस्थळी दाखल झाली आहे. AAIB चे डायरेक्टर जनरल स्वतः घटनास्थळी पोहोचले आणि पाहणी केली. मंत्रालयाने X वर जारी केलेल्या स्टेटमेंटनुसार, अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून, त्याचे विश्लेषण सुरू आहे. ब्लॅक बॉक्समधून शेवटच्या क्षणातील आवाज, फ्लाइट डेटा आणि वैमानिकांच्या संवादाची माहिती मिळेल, ज्यावरून अपघाताचे नेमके कारण समजेल. तपास कसा होणार? मुख्य फोकस कशावर? AAIB नियम २०२५ च्या रूल ५ आणि ११ नुसार तपास सुरू. कालमर्यादा आणि पारदर्शकताला सर्वोच्च प्राधान्य; SOP नुसार प्रक्रिया. दाट धुके/कमी दृश्यमानता, वैमानिकांचे निर्णय, बारामती विमानतळाच्या ऑपरेशनल मर्यादा (uncontrolled airfield), लँडिंगचा दुसरा प्रयत्न असफल होणे. विमानाचा ढिगारा ताब्यात घेणे, एअरफ्रेम, इंजिन लॉगबुक, देखभाल रेकॉर्ड, क्रू क्वालिफिकेशन, प्रमाणपत्रे यांची तपासणी. DGCA कडून क्रू आणि विमानाशी संबंधित कागदपत्रे मागवली; रडार डेटा, CCTV फुटेज, ATC टेप रेकॉर्डिंग आणि हॉटलाइन संवादांचे विश्लेषण होणार. विमान ऑपरेटर VSR Ventures (Delhi) च्या ऑफिसमध्ये AAIB अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली; देखभाल आणि एअरवर्थिनेस रेकॉर्ड ताब्यात घेतले. लाडक्या ‘दादा’ला जनसागराने दिला अखेरचा निरोप Ajit Pawar Black Box Investigation अजित पवार यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११ वाजता बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण बारामतीत जनसागर लोटल्याचे पाहायला मिळाले. सध्या बारामती ही शोकसागरात बुडाली असून शहरात ठिकठिकाणी श्रद्धांजलीचे बॅनर लावण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आणि संपूर्ण महाराष्ट्रात तीन दिवसांचा दुखवटा पाळण्याचे आदेश दिले.