Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी बारामती येथे विमान कोसळून झालेल्या अपघातात निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर आज विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. अजित पवार (Ajit Pawar)यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी देशभरातून जनसागर लोटला होता. त्यासोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील अजित पवारांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यासोबतच अंधरप्रदेशचे मंत्री चंद्रशेखर रेड्डी, सुशीलकुमार शिंदे, यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अजित पवार यांना यावेळी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यांच्यासह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, चंद्रशेखर बावनमुळे, सुनील तटकरे,पंकजा मुंडे, शाहू महाराज, जयंत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, अदिती तटकरे, अशोक चव्हाण , प्रणिती शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी यावेळी श्रद्धांजली वाहिली. Ajit Pawar :