अजित पवारांची दुसऱ्या दिवशीही अधिवेशनाला दांडी ; नाराज नेत्यांची मनधरणी करणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Ajit Pawar । महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीतील पक्षांच्या नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे समोर आले आहे. त्यात सर्वात चर्चेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. एकीकडे मंत्रिमंडळातून पत्ता कट केल्यानंतर छगन भुजबळांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांशी भेटीगाठी टाळल्या आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देखील अजित पवार सभागृहात उपस्थित नव्हते. तर आज अधिवेशनाचा दुसरा दिवस असला तरी अजित पवारांनी दांडी मारली आहे. छगन भुजबळ यांच्यासह नाराज असणाऱ्या नेतेमंडळींनी मनधरणी करण्यासाठी अजित पवार गैरहजर असल्याचे म्हटले जातंय.
अजित पवार कशी समजूत काढणार ? Ajit Pawar ।
आजवर जेव्हा जेव्हा भुजबळ अडचणीत आलेत किंवा मोठी लढाई लढण्याची त्यांनी तयारी केली तेव्हा तेव्हा समता परिषद आणि भुजबळ समर्थक मैदानात उतरले आहेत. आताही ते समता परिषदेच्या कार्यकर्त्यांशी आणि येवल्यातील जनतेशी संवाद साधून पुढील निर्णय घेतील असे म्हटले जात आहे. आणखी एका बंडाच्या तयारीत असणाऱ्या छगन भुजबळ यांची समजूत अजित पवार कशी काढणार हे पाहावं लागणार आहे.
प्रश्न मंत्रिपदाचा नाही, अवहेलना झाली Ajit Pawar ।
दरम्यान, छगन भुजबळ यांची भुजबळ फार्मवरील बैठक नुकतीच संपन्न झाली. कार्यकर्ते आणि समर्थकांशी भुजबळ यांनी आता बैठक घेत एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. आम्ही विचार करू सर्वांच्या मनात राग आहे…निराशा आहे. मंत्रिपद कोणी नाकारले हे शोधावे लागेल. कोणी नाकारले तरी पक्ष प्रमुख निर्णय घेतात. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदें तसेच अजित पवार निर्णय घेतात. प्रश्न मंत्रिपदाचा नाही अहवेलनाचा आहे. माझ्या मंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही होते, असंही छगन भुजबळ यांनी सांगितले. तसेच सर्वांशी बोलून शांतपणे निर्णय घेणार, असेही छगन भुजबळ यांनी यावेळी म्हटले आहे.
तर दुसरीकडे बारामतीतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटीच्या बाहेर ओबीसी समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. अजित पवारांनी छगन भुजबळ यांचं मंत्रीपद नाकारलं त्यामुळे आम्ही अजित पवारांच्या घराबाहेर त्या आंदोलन करीत आहोत असं आंदोलकांचे म्हणणं आहे. तसेच लवकरात लवकर अजित पवार अजित पवारांनी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे अन्यथा बारामतीत उद्रेक करू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. तसेच 22 तारखेला बारामतीत अजित पवारांचा नागरि सत्कार आहे त्यावेळेस अजित पवारांना आम्ही जाब विचारू असं ओबीसी आंदोलकांनी म्हटले आहे.
हेही वाचा
“मी काय तुमच्या हातातील खेळणं आहे का?” मंत्रीपद न मिळाल्याने छगन भुजबळ संतापले





