अजित पवार पुन्हा एकदा झळकले भाजपच्या बॅनरवर
Updated On:

कल्याण: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे अजितदादा पुन्हा एकदा भाजपच्या बॅनरवर झळकले आहेत. कल्याणमध्ये लागलेल्या एका बॅनरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. कल्याणमध्ये सध्या देवेंद्र फडणवीस चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेला आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आले होते.
या स्पर्धेसाठी लावलेल्या बॅनरवर देवेंद्र फडणवीस, भाजपवासी झालेले गणेश नाईक आणि स्थानिक भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या फोटोंच्या सोबतच अजितदादांचाही फोटो लावण्यात आला होता. यामुळे साहजिकच कल्याणकरांच्या भुवया उंचावल्या आणि या बॅनरची चर्चा सुरू झाली. मात्र अजित पवार हे कबड्डी असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष असल्याने त्यांचा फोटो लावल्याचे स्पर्धेचे आयोजक, स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले.





