Ajinkyatara Fort : अजिंक्यतारा किल्ल्यावरुन पडून एकाचा मृत्यू
Ajinkyatara Fort : एक व्यक्ती किल्ल्याच्या कड्यावरून खोल दरीत पडल्याची कॉल मिळताच शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सच्या टीमने आवश्यक साहित्यासह किल्ल्यावर धाव घेतली।

Ajinkyatara Fort : अजिंक्यतारा किल्ल्यावरुन सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळून सोमवार दि. 2 रोजी एक व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीचे नाव समजले नसून ती व्यक्ती दरीत कोसळल्याचे समजताच साताऱ्यातील ‘शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्स’ची टीम तातडीने घटनास्थळी रवाना झाली. युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित व्यक्ती किल्ल्याच्या कड्यावरून पाय घसरून थेट खोल दरीत कोसळली. या घटनेचा कॉल मिळताच शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सच्या टीमने आवश्यक साहित्यासह किल्ल्यावर धाव घेतली. दरीची खोली आणि ठिकाण अत्यंत दुर्गम असल्याने बचावकार्यात मोठे आव्हान उभे राहिले.
मात्र, ट्रेकर्सचे पथक दोरखंडाच्या साहाय्याने खाली उतरून व्यक्तीपर्यंत पोहचले. व्यक्ती जखमी अवस्थेत बेशुद्ध आढळली. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टराकडून सांगण्यात आले.
हेही वाचा:
White Clothes Care: पांढरे कपडे राहतील वर्षानुवर्षे चमकदार! धुताना या सोप्या टिप्स नक्की पाळा






