Son of Sardar 2 : सध्या बॅाक्स अॅाफिसवर सैयारा हा चित्रपट धूमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने रिलीज होताच चांगली कमाई केली आहे. येत्या काही दिवसांत हा चित्रपट आणखी चांगल्या कमाईचा गल्ला गोळा करू शकतो असे सांगण्यात येत आहे. अशातच अभिनेता अजय देवगण याचा सन अॅाफ सरदार २ या चित्रपटाच्या टीमने मोठा निर्णय घेतला आहे. सियारा या चित्रपटाचा वाढता प्रतिसाद पाहता सन अॅाफ सरदार २ चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट आधी २५ जुलै रोजी प्रदर्शित होणार होता. आता तो १ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. अहान पांडे आणि अनित पद्ढा यांचा ‘सैयारा’ हा चित्रपट १८ जुलै रोजी प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाईचे आकडे आपले नावे केले. पहिल्याच दिवशी तब्बल २० कोटी रुपयांची कमाई करणारा २०२५ मधील चौथा सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला आहे. बॉलीवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘सैयारा’ चित्रपटाने रिलीजच्या दिवसापासूनच अप्रतिम कामगिरी केली आहे. आठवड्याच्या शेवटी हा चित्रपट आणखी चांगला व्यवसाय करेल अशी अपेक्षा आहे. दुसऱ्या आठवड्यातही तो चांगली कमाई करेल अशी अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत ‘सन ऑफ सरदार २’ सारख्या मोठ्या चित्रपटाचे प्रदर्शन दोन्ही चित्रपटांसाठी चांगले नाही. या प्रदर्शनामुळे दोन्ही चित्रपटांच्या कमाईवर परिणाम होईल. म्हणूनच अजय देवगणने जिओ स्टुडिओ आणि इतरांसह त्यांच्या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले आहे, असे सांगितले आहे. सन अॅाफ सरदार २ चित्रपटात अजय देवगण, मृणाल ठाकूर, रवी किशन, नीरू बाजवा, दीपक डोबरियाल, कुब्रा सैत, चंकी पांडे, शरत सक्सेना, विंदू दारा सिंग, संजय मिश्रा, अश्विनी काळसेकर आणि मुकुल देव हे आदी कलाकार आहेत. हेही वाचा : चीनकडून ब्रह्मपुत्रेवर जगातील सर्वात मोठ्या धरणाचे बांधकाम सुरु ; भारताचे टेन्शन वाढले