Red 3 : २०१८ मध्ये ‘रेड’ प्रदर्शित झाला. त्यानंतर २०२५ मध्ये ‘रेड २‘ आला. अभिनेता अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या या दोन्ही चित्रपटांनी बॅाक्स अॅाफिसवर धुमाकूळ घातला. आता रेडच्या तिसऱ्या भागाची चर्चा रंगली असून, याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. निर्माते रेड फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागावर काम करत असून अजय देवगणचा ‘रेड ३‘ लवकरच प्रदर्शित होणार आहे. अजय देवगण ‘रेड ३’ च्या कामात व्यस्त आहे. अजयने पुन्हा एकदा दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांच्यासोबत काम करताना दिसणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून निर्माते ‘रेड ३’ च्या स्क्रिप्टवर काम करत आहेत. पिंकव्हिलामधील एका वृत्तानुसार, चित्रपटाची पटकथा अंतिम टप्प्यात आली आहे. पुढच्या वर्षी रेड ३ च्या चित्रीकरणाला सुरूवात केली जाणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रेडचा तिसरा भाग पहिल्या दोन भागंपेक्षा अधिक प्रभावी असणार आहे. या चित्रपटाची कथा पहिल्या दोन भागांपेक्षा वेगळी असणार आहे. अजय देवगण अनेक चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. त्याचे सध्याचे प्रकल्प पूर्ण होताच निर्माते या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करतील, अशी माहिती आहे. जून २०२६ च्या आसपासची तारीख निश्चित केली आहे. रेड फ्रँचायझीमधील पहिला चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. अजय देवगणने या चित्रपटात एका आयकर अधिकाऱ्याची भूमिका केली होती. या चित्रपटाने जगभरात १५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. तर २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रेड २’ लाही चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा टप्पा ओलांडला. जगभरात या चित्रपटाने २३५ कोटींपेक्षा जास्त कमाई केली. त्यामुळे अजयच्या चाहत्यांना रेड ३ ची उत्सुकता लागलेली आहे. हेही वाचा : ट्रम्प यांनी पुन्हा आळवला युद्ध थांबवल्याचा सूर ; म्हणाले,”…पण मी ते भारतासोबत केलं अन् भारत-पाक युद्ध थांबलं”