अजय देवगणचा ब्लॉकबस्टर ‘रेड २’ चित्रपट ओटीटीवर पाहता येणार; कधी आणि कुठे?

Raid 2 OTT Release | अभिनेता अजय देवगण आणि रितेश देशमुख यांची जोडी ‘रेड २’ चित्रपटात पाहायला मिळाली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.
राज कुमार गुप्ता दिग्दर्शित ‘रेड २’ हा २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रेड’ या सिनेमाचा सिक्वेल आहे. या चित्रपटाद्वारे अजय देवगण पुन्हा एकदा आयकर अधिकारी अमय पटनायकच्या भूमिकेत दिसला. त्याने आपल्या दमदार अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली.
हा चित्रपट २६ जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. निर्मात्यांनी २५ जूनला पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली. निर्मात्यांनी बुधवारी रात्री त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर ‘रेड २’ च्या ओटीटी रिलीजची घोषणा करत “ट्रान्सफर कन्फर्म, आयआरएस अमय पटनायकच्या छाप्यासाठी तयार आहात? रेड २ पाहा, आता नेटफ्लिक्सवर,” असे लिहिले आहे. Raid 2 OTT Release |
‘रेड २’ मध्ये अजय देवगण, रितेश देशमुख, वाणी कपूर आणि सौरभ शुक्ला यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. राज कुमार गुप्ता दिग्दर्शित ‘रेड २’ १ मे २०२५ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. ४८ कोटी रुपयांचे बजेट असलेल्या ‘रेड २’ ने भारतात १७८.८ कोटींचे कलेक्शन केले. तर जगभरात २४३.०६ कोटी रुपयांची कमाई केली. यानंतर आता हा चित्रपट तुम्हाला घर बसल्या पाहता येणार आहे. Raid 2 OTT Release |
हेही वाचा:
“आमचा हल्ला हिरोशिमा-नागासाकीसारखा..” ; इराण-इस्रायल युद्धावर ट्रम्प यांचे धक्कादायक विधान





