ऐश्वर्याने मुलगी आराध्यासोबत घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन ! भक्तिमय वातावरणात रमल्या माय-लेकी

मुंबई – मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन या नावाला कोणत्याही परिचयाची आवश्यकता नाही. अनेक दिवसांपासून बॉलिवूडपासून दूर गेलेल्या ऐश्वर्याने मनी रत्नम यांच्या पीएस १ मधून मोठ्या पडद्यावर दमदार पुनरागमन केलं. कौटुंबिक जीवनात व्यस्त असल्यामुळे ऐश्वर्या चित्रपटांपासून काहीशी दूर होती. 1 नोव्हेंबर रोजी अभिनेत्रीने आपला ४९ जन्मदिवस साजरा केला. यावेळी तिने आपल्या मुलीसह सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी हजेरी लावली.
ऐश्वर्या राय सर्व अभिनेत्रींमध्ये वेगळी आहे, तिची शैली देखील इतरांपेक्षा हटके आहे. ऐश्वर्यानेही तिचा वाढदिवस तिच्या खास पद्धतीने साजरा केला. ऐश्वर्याने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनेत्री तिची मुलगी आराध्यासोबत फोटोंमध्ये दिसत आहे.ऐश्वर्या राय बच्चन मुलगी आराध्या बच्चनसोबत तिच्या ४९ व्या वाढदिवसानिमित्त पहिल्यांदा मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली. फोटोमध्ये ऐश्वर्या आणि आराध्या अगदी सध्या परंतु आकर्षक कपडे परिधान केलेले दिसत आहेत. ऐश्वर्याने पांढऱ्या सूटवर गुलाबी आणि सोनेरी रंगाची शाल कॅरी केली आहे.
View this post on Instagram
ऐश्वर्याने इंस्टाग्रामवर याबाबत पोस्ट करत लिहिले, ‘तुमच्या सर्वांच्या प्रेम, शुभेच्छा, आशीर्वाद आणि खूप सकारात्मकतेसाठी खूप खूप धन्यवाद.. गॉड ब्लेस. बऱ्याच दिवसानानंतर ऐश्वर्या आपली मुलगी आराध्यसह दिसून आली. दोघी मायलेकींचा भक्तिमय अंदाज चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.





