Aishwarya Rai : बॉलिवूड अभिनेत्री व माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. गेल्या काही महिन्यांत ती बच्चन कुटुंबासोबत क्वचितच दिसल्याने तिच्या आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल अफवा पसरू लागल्या आहेत. अशातच पाकिस्तानातील धर्मगुरू मुफ्ती अब्दुल कावी यांनी ऐश्वर्याबद्दल केलेलं विधान मोठ्या वादाला तोंड फोडत आहे. मौलवीचं वक्तव्य व्हायरल मौलवी अब्दुल कावी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्यांनी ऐश्वर्या रायचं नाव बदलून “आयशा राय” करण्याचा दावा करत काही वैयक्तिक स्वरूपाची वक्तव्ये केली आहेत. त्यांच्या या विधानांमुळे ऐश्वर्याचे चाहते संतप्त झाले आहेत आणि सोशल मीडियावरून मौलवीवर टीकेची झोड उठली आहे. ऐश्वर्याशी लग्नाची इच्छा व्यक्त या व्हिडिओमध्ये मौलवी कावी यांनी ऐश्वर्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली असून, “ऐश्वर्या राय पुढील काही महिन्यांत मला लग्नाचा प्रस्ताव पाठवेल,” असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. तसेच ती मुस्लिम धर्म स्वीकारेल, असेही त्यांनी बोलून दाखवले. त्यांच्या या विधानांमुळे चाहत्यांमध्ये संतापाची लाट दिसून आली असून, नेटिझन्सनी त्यांच्यावर टीकेचा वर्षाव केला आहे. अभिषेक-ऐश्वर्या नात्याबद्दलही टिप्पणी वायरल व्हिडिओमध्ये मौलवींनी ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या नातेसंबंधांबद्दलही आपले मत मांडत, “दोघांमध्ये मतभेद असावेत अशी चर्चा ऐकू येते. अल्लाहच्या कृपेने त्यांचं सर्व काही ठीक राहो. पण ते वेगळे झाले, तर ऐश्वर्याकडून मला निमंत्रण येईल,” असे वक्तव्य केल्याचे दिसते. चाहत्यांचा संताप ऐश्वर्या रायच्या चाहत्यांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध केला असून, सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांनी हे वक्तव्य असभ्य आणि अयोग्य असल्याचं सांगत मौलवीविरुद्ध कारवाईची मागणीही केली आहे.