Aishwarya Rai: रेड फिल्म फेस्टिवलमध्ये झळकली ऐश्वर्या राय; “अस्सलामु अलैकुम” म्हणत प्रेक्षकांना दिला खास नमस्कार

Aishwarya Rai: बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री आणि भारतीय सिनेमाची ओळख मानल्या जाणाऱ्या ऐश्वर्या राय बच्चन यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय मंचावर आपली मोहोर उमटवली आहे. सौदी अरेबियात सुरू असलेल्या रेड सी फिल्म फेस्टिवलच्या पाचव्या पर्वात त्या सहभागी झाल्या असून, त्यांच्या उपस्थितीने प्रेक्षकांचा उत्साह दुप्पट झाला.
खास अंदाजात दिला प्रेक्षकांना नमस्कार
कार्यक्रमात ऐश्वर्या जेव्हा ब्लॅक रंगाच्या आकर्षक ड्रेसमध्ये स्टेजवर आल्या, तेव्हा संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. प्रेक्षकांकडे बघून हसतच त्यांनी हात हलवला आणि म्हटले, “नमस्ते… अस्सलामु अलैकुम!”
त्यांच्या या आदबशीर शैलीवर चाहत्यांनी भरभरून प्रेम व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान एका प्रेक्षकाने “I love you” म्हणत भावना व्यक्त केल्या, त्यावर ऐश्वर्यानेही हसत उत्तर दिले, “मीही तुम्हा सगळ्यांवर प्रेम करते.”
View this post on Instagram
लुकवर चाहत्यांचा वर्षाव
फेस्टिवलमधील आपला लुक ऐश्वर्याने इंस्टाग्रामवरही शेअर केला आहे. रेड हार्ट इमोजीसह पोस्ट केलेल्या त्यांच्या काही सुंदर फोटोंवर चाहत्यांकडून भरपूर प्रतिक्रिया मिळत आहेत. ब्लॅक गाऊनमधील त्यांचे हे लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
रेड सी फिल्म फेस्टिवल 2025 मध्ये कोण कोण?
या भव्य सोहळ्यात ऐश्वर्या भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या निवडक कलाकारांमध्ये आहेत. येत्या काही दिवसांत अभिनेत्री कृति सेननही या उत्सवात सहभागी होणार आहे. याशिवाय हॉलीवूड कलाकार कर्स्टन डंस्ट, ‘द व्हॅम्पायर डायरीज’ची नीना डोब्रेव, तसेच क्वीन लतीफा अशा मोठ्या नावांनीही या फेस्टिवलची शोभा वाढवली आहे.
फिल्म फेस्टिवलचे आयोजन
रेड सी फिल्म फेस्टिवलचा हा प्रतिष्ठित महोत्सव १३ डिसेंबरपर्यंत चालणार असून, एंजेलिना जोलीची ‘कुत्यूर’, ज्यूड लॉची ‘द विजार्ड ऑफ द क्रेमलिन’, तसेच रूपर्ट वायट दिग्दर्शित ‘डेजर्ट वॉरियर’ यांसारख्या चर्चित चित्रपटांचे प्रदर्शन या दरम्यान होणार आहे.





