मुंबई : मागील काही वेळापासून एअरटेलच्या सिम कार्ड धारकांना रेंज आणि नेटवर्कच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी एअरटेलच्या सेवांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. वापरकर्त्यांनी काय करावे? सिम तपासणी : सिम कार्डवर खरचटले किंवा खराब झाले नसल्याची खात्री करा. फोन सेटिंग्ज : एअरप्लेन मोड बंद करा आणि नेटवर्क मोड मॅन्युअली 2G/3G/4G वर सेट करा. सॉफ्टवेअर अपडेट : फोनचे सॉफ्टवेअर अपडेट करा. ग्राहक सेवा : एअरटेलच्या 121 या क्रमांकावर किंवा एअरटेल थँक्स ॲपद्वारे संपर्क साधा. एअरटेलने नेटवर्क सुधारणेसाठी तातडीने पावले उचलण्याचे आश्वासन दिले असून, वापरकर्त्यांना लवकरच सुधारित सेवा मिळण्याची अपेक्षा आहे.