Airtel plans: टेलिकॉम कंपनी एअरटेल ( Airtel) ने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी मोठा बदल केला आहे. आतापर्यंत बहुतांश रिचार्ज प्लान्स २८ दिवसांसाठी वैध असायचे, मात्र आता कंपनीने १२ महत्त्वाच्या प्लान्सची वैधता वाढवून थेट ३० दिवस केली आहे. त्यामुळे ग्राहकांना दर महिन्याला वारंवार रिचार्ज करण्याची गरज कमी होणार असून, वर्षभरात होणारा खर्चही काही प्रमाणात कमी होऊ शकतो. (Airtel plans) या नव्या बदलात ग्राहकांना केवळ जास्त वैधता नाही, तर डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि OTT प्लॅटफॉर्म्सचे फायदेही दिले जात आहेत. ३७९ रुपयांचा प्लान हा सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठी चांगला पर्याय आहे. या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. याशिवाय एअरटेल म्युझिक, हेलो ट्यून्स आणि गुगल वन चा ३० जीबी क्लाउड स्टोरेजसारखे फायदेही मिळतात. (Airtel plans) ज्यांना जास्त इंटरनेट लागते त्यांच्यासाठी ४२९ रुपयांचा प्लान उपयुक्त ठरतो. यात दररोज २.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस मिळतात. तसेच एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले चा ऍक्सेस मिळतो, ज्यामुळे मनोरंजन अधिक चांगले होते. Airtel plans याशिवाय ५८९ आणि ६०५ रुपयांचे प्लान्सही कंपनीने उपलब्ध केले आहेत. या दोन्ही प्लान्समध्ये ३० दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग आणि ३०० एसएमएस मिळतात. ५८९ रुपयांत ५० जीबी डेटा मिळतो, तर ६०५ रुपयांत ६० जीबी डेटा दिला जातो. हे प्लान्स व्हिडिओ स्ट्रीमिंग, गेमिंग किंवा वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी खास उपयुक्त आहेत. (Airtel plans) मनोरंजन आवडणाऱ्यांसाठी २७९ रुपयांचा खास प्लान आणण्यात आला आहे. यात डेटा कमी म्हणजे १ जीबी मिळतो, पण नेटफ्लिक्स, जिओहॉटस्टार, झी आणि एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले यांसारख्या OTT प्लॅटफॉर्म्सचा ऍक्सेस मिळतो. डेटा वाउचर्समध्येही बदल करण्यात आला आहे. ४८ रुपयांत १ जीबी डेटा आणि जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शन मिळते. १०० रुपयांत ६ जीबी डेटा दिला जातो. १६१ रुपयांत १२ जीबी डेटा, तर १९५ रुपयांत १२ जीबी डेटा सोबत OTT फायदे मिळतात. ३६१ रुपयांचा प्लान ५० जीबी डेटा आणि ३ महिन्यांचे OTT सबस्क्रिप्शन देतो. एकूणच, एअरटेलचा हा निर्णय ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. ३० दिवसांची वैधता मिळाल्यामुळे आता रिचार्ज अधिक सोपा आणि किफायतशीर होणार आहे.