‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्व यंत्रणांचा ‘Alert mode on’ ; विमान कंपन्यांचा मोठा निर्णय, सर्व उड्डाणे रद्द

Airlines on ‘Operation Sindoor’। ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारतातील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर असून, सीमावर्ती आणि संवेदनशील क्षेत्रांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. या ऑपरेशनच्या पार्श्वभूमीवर, विमान कंपन्यांनी मोठा निर्णय घेतला असून, अनेक शहरांमधील उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय वायुसेना, सेना आणि नौदलाने 7 मे 2025 च्या मध्यरात्री 1:30 वाजता पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले केले. या कारवाईत 70 हून अधिक दहशतवादी ठार झाले असून, जैश-ए-मोहम्मद आणि लश्कर-ए-तैयबा यांच्या मुख्यालयांचा समावेश आहे. ही कारवाई पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून करण्यात आली, ज्यामध्ये 22 एप्रिल रोजी अनेक नागरिकांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, भारतीय लष्कराच्या कारवाईनंतर देशातील अनेक विमान कंपन्यांनी त्यांची उड्डाणे रद्द केली आहेत . तसेच सरकारकडून पुढील आदेश येईपर्यंत विमानतळ बंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विमान कंपन्यांनी प्रवाशांना नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, उड्डाणांचे वेळापत्रक तपासण्याचे आणि प्रवासाचे नियोजन बदलण्याचे आवाहन केले आहे. या कारवाईमुळे भारत-पाकिस्तान संबंधांवर तणाव वाढला असून, आंतरराष्ट्रीय समुदाय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
एअर इंडिया: जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपुर, अमृतसर, भुज, जामनगर, चंडीगढ़ आणि राजकोट या शहरांसाठी 7 मे 2025 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व उड्डाणे रद्द. Airlines on ‘Operation Sindoor’।
इंडिगो: बिकानेरसह अनेक विमानतळांवरील उड्डाणे बंद, प्रवाशांना प्रवासाचे नियोजन बदलण्याचे आवाहन.
इतर विमानतळ: श्रीनगरसह देशातील 11 विमानतळांवर सर्व कार्यवाही बंद, अमृतसर येथील श्री गुरु रामदास आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद, येथील विमाने इतर शहरांकडे वळवली.
#TravelUpdate: Due to ongoing situation, airports in parts of northern India, including Dharamshala (DHM), Leh (IXL), Jammu (IXJ), Srinagar (SXR), and Amritsar (ATQ), are closed until further notice. Departures, arrivals, and consequential flights may be impacted. Passengers are…
— SpiceJet (@flyspicejet) May 6, 2025
तर दुसरीकडे भारताचया कारवाईने पाकिस्तनामध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे इस्लामाबाद आणि लाहौर विमानतळांवरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तसेच लाहौर विमानतळावर आपातकालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली असून प्रवाशांना टर्मिनल रिकामे करण्याचे आदेश.
गृह मंत्रालयाकडून सुरक्षा उपायाचे आदेश Airlines on ‘Operation Sindoor’।
* गृह मंत्रालयाने अर्धसैनिक दलांच्या सर्व सुट्ट्या रद्द केल्या.
* सीमावर्ती भागात भारतीय सेना आणि सुरक्षा दल सतर्क, पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरू.
* भारतीय वायुसेना कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज.





