नवी दिल्ली – भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि संबंधित हवाई वाहतूक प्राधिकरणांनी वैमानिकांसाठी सूचना जारी केल्या आहेत. या सूचनेनुसार भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागातील ३२ विमानतळांवरील सर्व नागरी विमान उड्डाणे १५ मे पर्यंत तात्पुरती बंद ठेवली जाणार आहेत. अधमपूर, अंबाला, अमृतसर, अवंतीपूर, बठिंडा, भुज बिकानेर, चंदीगड, हलवारा, हिंडन, जैसलमेर, जम्मू, जामनगर, जोधपूर, कांडला, कांग्रा (गग्गल), केशोद, , शनगड, कुल्लू मनाली (भुंतर), लेह, लुधियाना, मुंद्रा, नलिया, पठाणकोट, पटियाला, पोरबंदर, राजकोट (हिरासर), सरसावा, शिमला, श्रीनगर, थॉईस आणि उत्तरलाई यी विमानतळांवरील वाहतूक विस्कळीत होणार आहे. याशिवाय भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे दिल्ली आणि मुंबई हवाई वाहतूक माहिती क्षेत्रातील हवाई वाहतूक सेवा मार्गांर्गतचे २५ विभाग देखील तात्पुरते बंद ठेवले जाणार आहेत. विमान कंपन्या आणि विमान चालकांनी सध्याच्या हवाई वाहतूक विषयक मार्गदर्शक सूचनांनुसार पर्यायी मार्गांचे नियोजन करावे असा सल्लाही दिला गेला आहे.