सुंदरबनी : भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज जम्मू काश्मीर येथील सुंदरबनी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना एयर स्ट्राईक व सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावरून राहुल गांधी यांच्यावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, “राहुल गांधी यांना भारताने पाकिस्तानातील दहशतवादी प्रशिक्षण तळावर केलेला हवाई हल्ला रुचत नसून त्यांचे गुरु सॅम पित्रोदा म्हणतात, ‘काही लोकांच्या चुकीसाठी देशावर हल्ला करणं चुकीचं आहे.’ मला त्यांना प्रश्न विचारावा वाटतो की ते लोक तुमची भाऊबंदकी लागतात का?”
यावेळी बोलताना त्यांनी जनतेला भाजप सरकारला कौल देण्याचे आवाहन देखील केले. ते म्हणाले, “जर भाजप सरकार पुन्हा सत्तेत आले तर आम्ही काश्मीरला भुंग्याप्रमाणे पोखरणाऱ्या शक्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करू.”
BJP President Amit Shah in Sunderbani, Jammu & Kashmir: Airstrike Rahul baba ko hajam nahi ho raha hai…Unke guru Sam Pitroda kehte hain 'kuch logon ki harkaton ke kaaran desh pe hamla nahi karna chahiye.' Kyun, aapke chachere bhai lagte hain kya? pic.twitter.com/42bcFoOrVJ
— ANI (@ANI) April 3, 2019
Amit Shah in Sunderbani, J&K: If you choose Narendra Modi govt, in next 5 years we'll oust every single infiltrator from the country. Infiltrators are eating our country like termites. They want to change demography of Jammu. As long as there's BJP govt, we won't let this happen. pic.twitter.com/rbojyZoq5U
— ANI (@ANI) April 3, 2019