Japan Airlines : जपानमध्ये विमानसेवा विस्कळीत; काय घडले नेमके?

जपानची दळणवळण सेवा विस्कळीत झाली आहे. सायबर अटॅकमुळे ही सेवा विस्कळीत झाली आहे. या सायबर अटॅकमुळे विमानतळावरील तिकीट काऊंटवर बंद झाले आहेत. यामुळे प्रवासी ताटकळले आहेत. आज सकाळी 7:24 वाजता हा हल्ला करण्यात आला. हा हल्ला कोणी केला? तसेच सेवा सुरळीत होण्यासाठी प्रवाशांना किती तास वाट पाहावी लागणार ? हे अद्याप समजू शकलेले नाही.
विमानसेवेला मोठा फटका
जपान एअरलाईन्सने याविषयीचे एक ट्विट केले आहे. त्यानुसार, 7:24 वाजता आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विमानसेवेला फटका बसला आहे. सायबर हल्ल्यामुळे तिकीट विक्री सिस्टिम प्रक्रिया ठप्प झाली आहे. तिकीट विक्रीसाठीची नोंदणी आणि इतर अंतर्गत सेवा प्रभावित झाली आहे. विमान सेवेच्या वेळा अपडेट होत नसल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. तर ज्यांना इतर ठिकाणी, शहरात जायचे होते, ते हजारो प्रवासी विमानतळावर ताटकळले आहे. तिकीट विक्री सध्या बंद करण्यात आली आहे. सायबर तज्ज्ञ समस्या सोडवण्यासाठी मदतीला धावले आहे. लवकरच ही समस्या सोडवण्यात येईल, असा विश्वास एअरलाईन्सकडून व्यक्त करण्यात आला आहे.
【ネットワーク機器不具合に関するお知らせ】
本日、7時24分から社内外を繋ぐネットワーク機器でシステム不具合が発生しております。国内線、国際線ともに運航への影響も想定されます。状況の確認が取れ次第、次回の案内にてお知らせいたします。ご迷惑をおかけしておりますことをお詫び申し上げます。— JAL 運航情報【公式】 (@JAL_flight_info) December 26, 2024
जपान एअरलाईन्स ही ऑल निप्पॉन एअरवेज नंतर, या देशातील दुसरी सर्वात मोठी विमान कंपनी आहे. जपानमध्ये सायबर अटॅक पहिल्यांदाच झाला असे नाही. यापूर्वी सुद्धा सायबर हल्ला करण्यात आला आहे. यावर्षी जून महिन्यात जपानमधील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म निकोनिकोवर सायबर हल्ला झाला होता. हा व्हिडिओ-ऑडिओ प्लॅटफॉर्म आहे. सायबर हल्ल्यामुळे सर्व सेवा निलंबित करण्यात आल्या होत्या.





