नवी दिल्ली – अहमदाबाद मधून निघणार्या आंतरराष्ट्रीय विमानातून प्रवाशांना दागिन्याच्या आयातीची किंवा निर्यातीची पार्सल सोबत बाळगता येणार आहेत. या सदर्भातील निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. वाणिज्य मंत्रालयाने या संदर्भात जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दागिन्यांची आयात आणि निर्यात सुरक्षितरीत्या होण्याची गरज ध्यानात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या अगोदर दिल्ली, मुंबई, कोलकत्ता, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद आणि जयपूर येथील विमानतळावरून प्रवाशांना दागिन्यांचे पार्सल घेऊन जाता येत होते. आता त्यामध्ये अहमदाबाद विमानतळाचा समावेश करण्यात आला आहे. भारत हा जगातील सर्वात मोठ्या दागिने निर्यात झाला पैकी एक देश आहे. या दागिन्यांची सुरक्षितरित्या निर्यात होण्याची गरज ध्यानात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. दागिने उत्पादकांनी यासंदर्भात केंद्र सरकारकडे मागणी करून वारंवार पाठपुरावा केला होता. तो ध्यानात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे दागिने निर्यातीला चालना मिळेल अशी अपेक्षा वाणिज्य मंत्रालयाने व्यक्त केली आहे.