Air India Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील प्रवाशांची यादी आली समोर; यादीमध्ये गुजरातच्या ‘या’ बड्या नेत्याचा समावेश

अहमदाबाद : अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. हे विमान अहमदाबादहून 242 प्रवाशांसह लंडनला जात होते. दुपारच्या सुमारास हा भीषण अपघात झाला यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विमानाने टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या 10 मिनिटातच हा अपघात झाला आहे. अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या AI-171 विमानाचा अपघात झाला. यादरम्यान आता या अपघातग्रस्त विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची यादी समोर आली आहे.
गुजरातच्या बड्या नेत्याचा समावेश
या प्रवासी विमानात 242 प्रवासी असल्याची माहिती आहे. अहमदाबादमधील मेघानी परिसरात हा विमान अपघात झाल्याची माहिती आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे देखील नाव प्रवाशांच्या यादीत आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रातदेखील मोठी खळबळ उडाली आहे. विजय रुपाणी हे विमानात 2D या आसनावर बसले असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात 30 प्रवासी ठार झाले असून मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पहा प्रवाशांची यादी 👇👇
या विमानात 242 प्रवासी होते. 10 क्रू मेंबर, 2 लहान मुलं, 232 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. एअर इंडियाचं AI 171 विमान आज दुपारी क्रॅश झालं. विमानाचा मागचा भाग कोणत्या तरी गोष्टीला धडकल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. मात्र नेमका अपघात कशामुळे झाला याचं कारण अद्याप समोर आलं नाही. टेकऑफनंतर 17 व्या मिनिटाला हे विमान हेलकावे खात खाली कोसळलं, या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
View this post on Instagram
या विमानाचे नेतृत्व कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांनी केले होते. कॅप्टन सुमित सभरवाल हे 8200 तासांचा अनुभव असलेले एलटीसी आहेत. सह-वैमानिकाला 1100 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. एटीसीनुसार, विमानाने अहमदाबाद येथील धावपट्टी 23 वरून 13.39 भारतीय वेळेनुसार (०८०९ यूटीसी) उड्डाण केले. त्यांनी एटीसीला मेडे कॉल केला, परंतु एटीसीने केलेल्या कॉलला विमानाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.





