एअर इंडियाच्या बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमानाला अपघात; विमानात २४२ प्रवासी, मोठ्या प्रमाणात जीवितहानी?

Air India plane crash। अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान अहमदाबादमधील मेघानी नगर येथे कोसळले. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान उड्डाणानंतर लगेचच कोसळले. अपघातानंतर विमानाला आग लागली.
अहमदाबादमधून मिळालेल्या छायाचित्रांमध्ये विमानातून दाट काळा धूर येत असल्याचे दिसून येत आहे. अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी उपस्थित असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विमानात १३० प्रवासी होते. अहमदाबादहून निघालेले एअर इंडियाचे हे विमान बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमान होते. हे विमान ११ वर्षे जुने होते. वृत्तसंस्थेनुसार, विमानात क्रू मेंबर्ससह २४२ लोक होते. Air India plane crash।
ताज्या माहितीनुसार, एनडीआरएफची टीम बचाव कार्यासाठी घटनास्थळी पाठवण्यात आली आहे. बीएसएफचे पथकही घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी बचावकार्य सुरू केले आहे. हे विमान दिल्लीहून अहमदाबादला पोहोचले होते आणि येथून लंडनला जाणार होते.
या दुःखद अपघाताबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी चर्चा केली आहे. अहमदाबाद पोलिस आयुक्तांनी सांगितले आहे की विमान अपघात मेघानीनगरमध्ये झाला. या घटनेनंतर अहमदाबादच्या आसपासच्या सर्व रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आपत्कालीन सेवा सक्रिय करण्यात आल्या आहेत. Air India plane crash।





