दुबईहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात काडतूस ; पोलिसांकडून तपास सुरु

Air India । दुबईहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात काडतुसे सापडली आहेत. विमानाच्या नियमित तपासणीदरम्यान हे काडतूस सापडले. तोपर्यंत सर्व प्रवासी विमानातून सुखरूप उतरले होते.
हे काडतूस दुबईहून आलेल्या एअर इंडियाच्या विमान एआय ९१६ च्या सीटच्या खिशात सापडल्याचे सांगण्यात येत आहे.
#BREAKING ❗🇮🇳Gun Cartridge Found On Air India Flight
The material was discovered in a seat pocket on the AI 916 from Dubai to Delhi during post-flight cleaning operations.#AirIndia pic.twitter.com/jRHG1QnFOJ
— The Global South Post (@INdEptHGlobal) November 2, 2024
काडतूस विमानात कसे आले याचा तपास सुरु Air India ।
विमान कंपनीने ही घटना गांभीर्याने घेतली आणि आवश्यक सुरक्षेच्या उपाययोजना केल्या. सध्या हे काडतूस विमानात कसे आले याचा तपास सुरू आहे.





