एड्‌सवर लस सापडल्याचा दावा

नवी दिल्ली – करोनाच्या संकटाने सगळ्यांना जेरीस आणले आहे. त्याचा बीमोड करण्यासाठी सगळे संशोधक अहोरात्र झटत आहेत. मात्र काही वेळा वाईटातून किंवा आपत्तीतून हाती काहीतरी चांगले येते किंवा नवीन काहीतरी गवसते असे म्हणतात. करोनामुळे तसाच काहीसा प्रकार होताना दिसतो आहे.
अगोदर करोनाचे संशोधन करत असताना कर्करोगावर उपाय सापडल्याचा दावा करण्यात आला आहे.

दोन वर्षांत या दिशेने ठोस उपाय उपलब्ध होतील असे सांगण्यात आल्यानंतर आता एडसबाबतही सकारात्मक बातमी आली आहे. जगभरात गेल्या कित्येक वर्षांपासून एड्‌स रोगाच्या लसीचा शोध सुरू आहे. पण आतापर्यंत कोणालाही यश आले नव्हते. परंतु आता एड्‌सवर प्रभावी असणारी लस मिळण्याची शक्‍यता आहे. एचआयव्हीबाबत आलेल्या या बातमीने आरोग्य क्षेत्रात काही प्रमाणात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नॉन प्रॉफिट ड्रग डेव्हलपर आणि स्क्रिॅप्स रिसर्च इन्स्टिट्यूटने फेब्रुवारी महिन्यात या लसीबाबत घोषणा केली होती. या लसीद्वारे शरीरामधील अँटीबॉडी निर्मितीसाठी मदत होणार असून नवीन सेल्स उत्पादन याद्वारे वाढेल असे संशोधनातून समोर आले आहे.

एचआयव्हीवर येणाऱ्या या लसीची घोषणा झाली असली तरी अजून या लसीला अनेक टप्पे पार करायचे आहेत. तसेच या लसीमुळे संपूर्ण जग एड्‌स मुक्त होईल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता या लसीची पहिली चाचणी झाली असून यापुढे होणाऱ्या चाचण्यात नेमका काय परिणाम दिसतो हे पाहिले जाणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.