भारत-पाक सामन्यादरम्यान ‘जय श्री राम’ची घोषणाबाजी ! स्टॅलिन पुत्र उदयनिधी प्रेक्षकांवर भडकला

नवी दिल्ली – अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या भारत-पाकिस्तान (Ind vs Pak) सामन्यात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) संघाने बाबर आझमच्या (Babar Azam) संघाचा सात गडी राखून पराभव केला. हा सामना पाहण्यासाठी एक लाखाहून अधिक लोक स्टेडियममध्ये उपस्थित होते. सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये जय श्री रामच्या (Jay shree ram) घोषणाही देण्यात आल्या. त्यामुळे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (M K Stalin) यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन (Udaynidhi) संतापले. या घोषणाबाजीवर त्यांनी तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे. उदयनिधी यांनी एक्सवर पोस्ट करून आपली नाराजी व्यक्त केली असून चाहत्यांना लक्ष्य केले आहे.
उदयनिधी यांनी ट्विट करून म्हटले- भारत आपल्या (World Cup 2023) क्रीडा भावनेसाठी आणि आदरातिथ्यासाठी प्रसिद्ध आहे. तथापि, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stedium) पाकिस्तानी खेळाडूंना दिलेली वागणूक अस्वीकार्य आणि अत्यंत खालच्या क्रमाची आहे. खेळ ही देशांना एकत्र आणणारी शक्ती बनली पाहिजे. तसेच खऱ्या बंधुभावाचा प्रसार झाला पाहिजे. द्वेष पसरवण्यासाठी त्याचा शस्त्र म्हणून वापर करणे निषेधार्ह आहे.
भारत आपल्या खिलाडूवृत्तीसाठी आणि आदरातिथ्यासाठी प्रसिद्ध आहे. तथापि, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पाकिस्तानी खेळाडूंना दिलेली वागणूक अस्वीकार्य आहे आणि ही नवीन पातळी आहे. खेळ ही देशांमधली एकता निर्माण करणारी, खरी बंधुता वाढवणारी शक्ती असली पाहिजे.
India is renowned for its sportsmanship and hospitality. However, the treatment meted out to Pakistan players at Narendra Modi Stadium in Ahmedabad is unacceptable and a new low. Sports should be a unifying force between countries, fostering true brotherhood. Using it as a tool… pic.twitter.com/MJnPJsERyK
— Udhay (@Udhaystalin) October 14, 2023
सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये जय श्री रामच्या जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोहम्मद रिझवानसह अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटूंना टीकेला सामोरे जावे लागले. याशिवाय सामन्यादरम्यान इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाशी संबंधित पोस्टरही समोर आले होते. यावर इस्रायलचे प्रत्युत्तरही आले.





