अहमदनगर : अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू
Updated On:

नेवासा : नेवासारोड – नेवासा फाटा रस्त्यावरील ज्ञानेश्वर महाविद्यालयाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन जण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी राञी घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे,की अज्ञात वाहन हे श्रीरामपूरच्या दिशेने जात असतांना मोटारसायकलवरुन जाणाऱ्या दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील अक्षय अनिल धायजे (२२) व सोहेल सादिक देशमुख (२३) या दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करुन अज्ञात वाहनाचा तपास नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार तुळसीराम गिते हे करत आहेत





