नगर – जिल्ह्यात आज 307 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 63 हजार 612 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे 96.38 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजलेपासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्णसंख्येत 195 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 1 हजार 415 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 52, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 48, आणि अँटिजेन चाचणीत 95 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 25, अकोले 1, जामखेड 1, कर्जत 2, कोपरगाव 1, नगर ग्रामीण 8, पारनेर 1, राहाता 3, राहुरी 2, संगमनेर 7, शेवगाव 1, श्रीगोंदा 2, श्रीरामपूर 1, अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 14, अकोले 3, जामखेड 1, कर्जत 1, कोपरगाव 5, नगर ग्रामीण 6, पारनेर 2, राहाता 3, राहुरी 2, संगमनेर 7, शेवगाव 1, श्रीगोंदा 2, श्रीरामपूर 1, अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजेन चाचणीत आज 95 जण बाधित आढळून आले. यामध्ये मनपा 6, अकोले 1, जामखेड 2, कर्जत 13, कोपरगाव 4, नगर ग्रामीण 1, नेवासे 5, पारनेर 7, पाथर्डी 16, राहाता 11, राहुरी 3, संगमनेर 16, शेवगाव 2, श्रीगोंदा 3, श्रीरामपूर 5, अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 49, अकोले 16, जामखेड 10, कर्जत 10, कोपरगाव 43, नगर ग्रामीण 13, नेवासे 18, पारनेर 9, पाथर्डी 21, राहाता 14, राहुरी 10, संगमनेर 45, शेवगाव 16, श्रीगोंदा 15, श्रीरामपूर 13, कॅन्टोन्मेंट 3, मिलिटरी हॉस्पिटल 2, अशा रुग्णांचा समावेश आहे.
नगर करोना अपेड्टस
बरे झालेली रुग्णसंख्या:63612
उपचार सुरू असलेले रुग्ण: 1415
जिल्ह्यातील मृत्यू:974
एकूण रुग्णसंख्या:66001