अहमदनगर – हंगा विद्यालयात क्रीडा महोत्सव

पारनेर – तालुक्यातील हंगा येथील न्यू इंग्लिश स्कूल हंगे विद्यालयात मुख्याध्यापक सुरेश थोरात व क्रीडा शिक्षक राजेंद्र टापरे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा महोत्सव आणि बाल आनंद मेळावा उत्साहात पार पडला. या क्रीडा महोत्सवात स्लो सायकलिंग, लिंबू चमचा, धावणे, संगीत खुर्ची, पोते उडी, छोटा भीमला लाडू खाऊ घालणे अशा विविध स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेचे पंच म्हणून अनिल खांदवे, सुदर्शन धस, संदीप शिंदे, रमेश दरेकर, रोहिदास भालेराव, जयसिंग खोडदे ,रावसाहेब पायमोडे यांनी काम पाहिले. संगीत खुर्ची, लिंबू चमचा या स्पर्धेचे पंच म्हणून शोभा भालेराव, जयश्री क्षीरसागर, भारती म्हस्के, राजश्री धात्रक, सुवर्णा भोर, ज्योती बांडे, कल्पना चौधरी यांनी काम पाहिले. मान्यवरांच्या उपस्थितीत कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करून व फीत कापून क्रीडा स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला.





