अहमदनगर – प्रा. अरुणा झिने यांना पीएच.डी. प्रदान

राहाता – लोणी येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील पर्यावरणशास्त्र विभागाच्या सहायक प्रा. अरुणा झिने यांना भगवंत विद्यापीठातून (अजमेर) पर्यावरणशास्त्र या विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.
प्रा. झिने यांनी ‘राहाता तहसीलमधील भूजल गुणवत्तेचे हंगामी मूल्यांकन आणि त्याचा ग्राहकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम’ या विषयावर संशोधन करून शोधनिबंध सादर केला होता. विद्यापीठाच्या समितीने हा शोधनिबंध मान्य करत पीएच.डी. पदवी प्रदान केली. त्यांना डॉ. अशित दत्ता यांचे प्रमुख मार्गदर्शन, तर पर्यावरणशास्त्रचे विभागप्रमुख डॉ. गोरक्ष पोंधे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल डाॅ. झिने यांचे संस्थेचे अध्यक्ष व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका लीलावती सरोदे, प्राचार्य डॉ. रामभाऊ पवार, उपप्राचार्य डॉ. अनिल वाबळे, डॉ. रणपिसे भाऊसाहेब, डॉ. गलांडे, पर्यावरण विभागप्रमुख डॉ. गोरक्ष पोंधे आदींनी अभिनंदन केले.





