अहमदनगर – ऐनवेळी केलेला पक्ष बदल हा आयुष्यातील सर्वात मोठा चुकीचा ‘निर्णय’

राजेंद्र वाघमारे
नेवासा – माझ्याकडून ऐनवेळी शिवसेना पक्ष बदलाचा चुकीचा निर्णय झाला नसता तर आज ही वेळ माझ्यावर आलीच नसती ? अशी स्पष्ट कबुली दस्तुरखुद्द शिर्डी लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी नेवासा फाटा येथे गुरुवार (दि.२९) रोजी सायंकाळी सहा वाजता झालेल्या पञकार परिषदेत बोलतांना दिली.
नेवासा फाटा येथे गृहरक्षक दलाचे तालुका समादेशक बाळासाहेब देवखिळे यांच्या निवासस्थानी झालेल्या पञकार परिषदेत माध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते याप्रसंगी उबाठा सेनेचे शहरप्रमुख नितीन जगताप, लक्ष्मीनारायण जोंधळे महाराज,शिवसेनेचे राजू लष्करे, स्वीय सहाय्यक बाळासाहेब सोनवणे,बाळासाहेब देवखिळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना माजी खासदार वाकचौरे यांनी त्यांच्या राजकिय जीवनातील स्पष्ट कबुली देत ते यावेळी म्हणाले की,मी ऐनवेळी केलेला पक्ष बदल हा आयुष्यातील सर्वात मोठा चुकीचा निर्णय ठरलेला असल्याचे मान्य करत आता पुन्हा आपण मातोश्रीवर जावून शिवबंधन हाती बांधलेले असून उबाठा सेनेचे पक्षप्रमुख व नेत्यांनी पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवून मला कामाला लागण्याचा आदेश दिलेला आहे त्यामुळे मी आता पुन्हा शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी कामाला लागलेलो असून माझ्या खासदारकीच्या काळात या मतदार संघातील प्रत्येक गावात सभामंडप व अन्य विविध योजनेच्या माध्यमातून विविध विकास कामे मार्गी लावलेले आहे तसेच बेलापूर – परळी रेल्वे मार्गाचे कामही मी पुर्णत्वास आणण्यासाठी सदैव प्रयत्न केलेले असतांना आज हे काम रखडलेचे दुर्देवी चिञ निर्माण झालेले असून पुन्हा या कामाकडे आपण लक्ष घालून रेल्वे मार्गाचे काम पुर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही माध्यमांशी बोलतांना यावेळी वाकचौरे यांनी दिली.
यावेळी पञकारांनी उबाठा सेनेकडून माजी मंञी बबनराव घोलप,भाऊसाहेब कांबळे आणि तुमच्या नावाची चर्चा सेनेकडून चालू झालेली आहे महाविकास आघाडीतील मिञ पक्ष असलेल्या इंदिरा कॉंग्रेस पक्षानेही या मतदार संघावर आपला दावा दाखल केलेला आहे जागा वाटपात ही जागा उबाठा सेनेकडून मिञ पक्षाकडे गेली तर मग आपली भूमिका काय? असा प्रश्न पञकारांनी वाकचौरे यांना विचारला असता ते म्हणाले की,या शिर्डी मतदार संघावर उबाठा सेनेचे मोठे प्राबल्य आहे त्यामुळे उबाठा सेना ही जागा दुसऱ्या राजकिय पक्षाच्या वाटेला जावू देणारच नसून पक्षाने मला कामाला लागण्याचा आदेशही दिला असल्याचे यावेळी त्यांनी ठणकावून बोलतांना सांगितले.
आपण पहिल्यांदाच शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रिय अध्यक्ष तथा केंद्रिय मंञी रामदास आठवले यांचा पराभव केला त्यामुळे आपण देशात प्रसिद्धी झोतात आलात तर ऐनवेळी अचानक आपण पक्ष बदल केल्यामुळे केवळ १७ दिवसात शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे हे निवडून आल्यामुळे खासदार होण्याचा बहूमान लोखंडे यांनी मिळविलेला आहे त्यामुळे ते ही देशात प्रसिद्ध झालेले आहेत आता प्रथम दर्शनी या मतदार संघातून उबाठा सेनेकडून माजी खासदार वाकचौरे विरुद्ध शिंदे सेनेकडून खासदार सदाशिव लोखंडे अशी लढत होण्याची शक्यता सद्य राजकिय घडामोडीतून दिसून येत असून पुन्हा आजी – माजी खासदार शिर्डीच्या राजकिय मैदानात विजयाची कसरत करतांना दिसून येत आहेत.





