अहमदनगर – ट्रॅक्टर चोरी प्रकरणी एकास अटक

पाथर्डी़ – ट्रॅक्टर चोरीप्रकरणी सिकंदर गुलाब शेख (रा.मोहरी ता.पाथर्डी) याला पोलिसांनी अटक केली आहे. शेख याच्याकडून वडगाव गुप्ता या ठिकाणाहून ट्रॅक्टर व त्याला ताब्यात घेण्यात आले. बाळासाहेब छबुराव जाधव (रा.जवखेडे खालसा, ता.पाथर्डी) यांनी ट्रॅक्टर चोरी केल्याबाबतची फिर्याद पाथर्डी पोलीस ठाण्यात दि.२४ सप्टेंबर रोजी दिली होती.
दि. २२ सप्टेंबर रोजी जाधव यांनी घरासमोर नवीन असलेला जॉन डीअर कंपनीचा ट्रॅक्टर लावला होता. त्यानंतर दि.२३ सप्टेंबर रोजी सकाळी तो आढळून आला नाही. त्यानंतर अज्ञात चोरट्याने ट्रॅक्टर चोरून नेला, असा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासा दरम्यान हा ट्रॅक्टर सिकंदर शेख यांच्याकडे असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांच्या पथकातील पोलीस हवालदार आजिनाथ बडे, पोलीस कॉ. प्रल्हाद पालवे व विनोद मासळकर यांनी या गुन्ह्यातील चोरी गेलेला ट्रॅक्टर व आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली.





