अहमदनगर : एकाच दिवसात नवे 810 करोनाबाधित

नगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही पोचले 79.74 टक्क्यांवर
नगर (प्रतिनिधी) – नगर जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल 810 नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. रोज वाढणाऱ्या संख्येच्या तुलनेत करोनाबाधितांची संख्या वाढण्याचा आज नवा उच्चांक झाला. दरम्यान, आज जिल्ह्यात 484 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयातील नोडल अधिकाऱ्यांनी दिली.
ल्ह्यात आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 15 हजार 15 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे 79.74 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवार) सायंकाळी सहा वाजल्यापासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्णसंख्येत 810 ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 3 हजार 549 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 273, अँटिजेन चाचणीत 243 आणि खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 294 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 167, संगमनेर 19, राहाता 1, पाथर्डी 5, नगर ग्रामीण 32, कॅन्टोन्मेंट 6, नेवासे 3, श्रीगोंदा 1, पारनेर 4, अकोले 3, राहुरी 18, कोपरगाव 3, जामखेड 2, मिलिटरी हॉस्पिटल 5 आणि इतर जिल्हा 4, अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजेन चाचणीत आज 243 जण बाधित आढळून आले. त्यामध्ये, मनपा 9, राहाता 46, श्रीरामपूर 17, कॅन्टोन्मेंट 5, नेवासे 7, श्रीगोंदा 32, पारनेर 14, अकोले 28, राहुरी 16, शेवगाव 24, कोपरगाव 22 आणि कर्जत 23, अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 294 रुग्णांची नोंद एकूण रुग्णसंख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 151, संगमनेर 16, राहाता 14, पाथर्डी 5, नगर ग्रामीण 40, श्रीरामपूर 16, कॅन्टोन्मेंट 4, नेवासे 6, पारनेर 6, अकोले 5, राहुरी 10, शेवगाव 2, कोपरगाव 7, जामखेड 11 आणि कर्जत 1, अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज 484 रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा 168, संगमनेर 22, राहाता 25, पाथर्डी 12, नगर ग्रामीण 65, श्रीरामपूर 32, कॅन्टोन्मेंट 10, नेवासे 11, श्रीगोंदा 18, पारनेर 17, अकोले 13, राहुरी 8, शेवगाव 7, कोपरगाव 24, जामखेड 34, कर्जत 16 मिलिटरी हॉस्पिटल 2, अशा रुग्णांचा समावेश आहे.
नगर करोना अपडेट
बरे झालेली रुग्ण संख्या: 15015
उपचार सुरू असलेले रूग्ण : 3549
आजपर्यंतचे मृत्यू : 267
एकूण रूग्ण संख्या : 18831





